अनेकवेळा जास्त चालल्याने किंवा खूप वेळ उभं राहिल्याने पाय दुखू लागतात.

लठ्ठपणा, शरीरात पोषक तत्वांची कमतरता किंवा चुकीच्या साईझच्या चपलेमुळेही पायात वेदना होऊ शकतात.

पायांतील वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

पाण्याच्या कमतरतेमुळेही पाय दुखू शकतात. म्हणूनच सर्वांनी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.

 हळदीमधील अँटी-ऑक्सीडेंट व अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे पायदुखीपासून आराम मिळतो.

जास्त व्यायाम करणे किंवा दुखापतीमुळेही पाय दुखू शकतात. वेदना कमी करण्यासाठी तुम्ही आईसपॅक वापरू शकता.

कोमट पाण्यात मीठ घालून त्याने पाय शेकल्यानेही वेदना कमी होण्यास मदत होते.

चुकीच्या साईजच्या चपलाही पायदुखीसाठी कारणीभूत ठरू शकतात. म्हणून नेहमी योग्य साईजच्या चपलांची निवड करावी.