मंगळवारी रात्री दिल्लीसह अनेक राज्यांत भूकंपाचा जोरदार धक्का बसला, अनेक लोक त्यामुळे भयभीत झाले.

यूट्यूबर अरमान मलिकने हा जीवनातील सर्वात मोठा भूकंप असल्याचे नमूद केले.

भूकंपानंतर अरमानने लगेच एक व्लॉग तयार केला. त्या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी पायल टेन्शनमध्ये दिसून आली. 

पायल प्रेग्नंट असून तिची डिलीव्हरी डेट जवळ आहे. भूकंप झाल्यानंतर पायल ओरडू लागली.

अरमानने सांगितलं की पायलला खूप टेन्शन आले आहे. संपूर्ण कुटुंब आणि स्टाफसह अरमान घराबाहेर निघाला.

व्हिडीओमध्ये अरमान व कृतिका हे दोघे पायलची समजूत घालत तिला टेन्शन न घेण्याबद्दल बजावताना दिसले. 

पायलला धीर यावा म्हणून अरमानने तिला मिठी मारून आश्वस्तही केले.

हा अतिशय भयानक भूकंप आहे, असे अरमानने व्हिडीओमध्ये नमूद केले.

एवढा वाईट भूकंप मी कधीच पाहिला नाही, असे मत घाबरलेल्या पायलने व्यक्त केले.