कच्च्या तेलाच्या किमती अनेक आठवड्यांपासून प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली स्थिर राहिल्यामुळे जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या सरासरी किमतींमध्ये घट झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पेट्रोलची सरासरी किंमत 140 रुपयांच्या खाली येऊन 139.17 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे, डिझेलची सरासरी किंमतही 150 रुपयांच्या मर्यादेच्या खाली येऊन 149.27 रुपये प्रति लिटर इतकी नोंदवली गेली आहे.
भारतातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 26 नोव्हेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. मुंबईत आज पेट्रोलचा दर ₹111.21, डिझेलचा दर ₹97.83 आणि सीएनजीचा दर ₹91.50 प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोलसाठी ₹112.04, डिझेलसाठी ₹98.68 आणि सीएनजीसाठी ₹100.50 मोजावे लागतील. नाशिकमध्ये पेट्रोल ₹112.44, डिझेल ₹99.07 आणि सीएनजी ₹98.50 ते ₹99.75 दरम्यान आहे. नागपूरमध्ये पेट्रोल ₹111.80, डिझेल ₹98.48 आणि सीएनजी ₹102.80 आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल ₹108.94, डिझेल ₹99.23 आणि सीएनजी ₹105 आहे. पालघरमध्ये पेट्रोल ₹111.62, डिझेल ₹98.89 आणि सीएनजी ₹85.75 इतका दर आहे. साताऱ्यात पेट्रोल ₹112.71, डिझेल ₹99.05 आणि सीएनजी ₹105.36 ते ₹107.71 इतका दर आहे, तर रत्नागिरीमध्ये पेट्रोल ₹113.17, डिझेल ₹99.77 आणि सीएनजी ₹97.50 ते ₹99.00 दरम्यान आहे.