राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे आज लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. निसर्गाचं बदललेलं स्वरूप पाहता शेती व्यवसाय हा येत्या काळामध्ये अडचणीत सापडणारा असाच आहे. त्यामुळे शेतीमालाला लागणारा उत्पादन खर्च कसा काढायचा हा आमच्या समोरचा एक प्रश्न आहे, वर्ल्ड बँकेने सांगितल्या प्रमाणे न्यू नॉर्मलचा धोका नॉर्मल म्हणजे नेहमी ही परिस्थिती ओढवू लागली आहे. त्यामुळे राज्य कृषी मूल्य आयोगाने केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला याबाबत पत्र लिहिला आहे