बीड जिल्ह्यात यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे लिंबा रुई गावातील शेतकऱ्याने आपली सीताफळाची बाग काढून टाकलीये. शेतकऱ्याने अक्षरश: जेसीबीच्या मदतीने ही झाडे तोडली आहेत. लिंबा रुई येथील अंगद पैठने या शेतकऱ्याने चार वर्षांपूर्वी आपल्या अडीच एकर शेतामध्ये सीताफळाची लागवड केली होती. या सिताफळातून आता उत्पादन सुरू होणार होते. परंतु यावर्षी अतिशय कमी पाऊस पडल्याने पाण्याची कमतरता जाणवत असल्याने उत्पादन मिळणार नाही आणि भविष्यात बागही टिकू शकणार नाही हे लक्षात आल्याने पैठणे यांनी आपल्या या अडीच एकर क्षेत्रातील बागेवर जेसीबी फिरवला आहे.