जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात रेणुकाई पिंपळगाव, पारधसह इतर गावांमध्ये दुष्काळी पिकांचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांचे संयुक्त पथक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन, मका आणि इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी करत आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्याने प्रशासनाकडून पंचनाम्यांना वेग आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.