केंद्र सरकारने डिलिमिटेशन विधेयक आणण्याच्या हालचाली सुरु केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधेयकावरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर जोरदार टिका केली आहे. ते फक्त डरकाळ्या फोडत आहेत. त्यांच्याकडे दुसरे काही नाही. ते एकाकी पडले आहेत. दातही नाहीत अन् नखेही नाहीत ते फक्त आवाज करत आहेत असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला तर त्यांचे स्वागतच आहे, असंही ते म्हणालेत.