उन्हाळा सुरू होण्याआधी बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण चित्र समोर आलंय. जिल्ह्यातील १६ गावांना आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तीन तालुक्यांत तब्बल १७ खासगी टँकर सुरू आहेत. देऊळगाव राजा तालुक्यात सर्वाधिक आठ गावांना टँकरचा आधार घ्यावा लागतोय. तर सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यांतही पाणीटंचाईने डोके वर काढलंय.