सात फुटाचा अजगर अचानक समोर; शेतकरी घामाघूम

×

सात फुटाचा अजगर अचानक समोर; शेतकरी घामाघूम

धुळे तालुक्यातील बाळापूर गावात चक्क सात फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.वरखेडी रोड परिसरातील भरत पाटील यांच्या शेताजवळ हा अजगर दिसून येताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले… घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र जयेश मराठे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या अजगराचे सुरक्षित रेस्क्यू केले.विशेष म्हणजे या अजगराला कोणतीही इजा न पोहोचवता लळिंग कुरणात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. साप दिसल्यास घाबरून न जाता त्याला मारण्याऐवजी सर्पमित्रांना माहिती द्या, असे आवाहनही करण्यात आले आहे..

Vishal Gangurde