नागपुरात मध्यरात्री भीम जयंतीचा उत्साह आणि जल्लोष पहायला मिळाला. बाराचा ठोका पडताच आसमंत 'जय भीम'च्या जय घोषाने निनादला. नागपूरच्या संविधान चौक, इंदोरा चौक,त्रिशरण चौकसह ठिकठिकाणी हजारो भीमसैनिक एकवटले. फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात भीम जयंती मध्यरात्री साजरी करण्यात आली.