इंदापूर तालुक्यात ड्रॅगन फळाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पारंपरिक पिकांबरोबरच आता विदेशी फळांमध्ये गणली जाणारी ही लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू लागली आहे. पुणे, सोलापूर आणि चाकण या प्रमुख बाजारपेठांमध्ये ड्रॅगन फळाला सरासरी ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. सध्या आठवड्यातून दोन ते तीन तोडे घेतले जात असून, या फळामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.