शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील गुरुद्वारांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराला विविध रंगांच्या विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, या आकर्षक सजावटीने परिसर उजळून निघाला आहे. गुरुनानक जयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुनानक जयंतीनिमित्त हजारो शीख बांधवांसह अन्य धर्मांचे भाविकही गुरुद्वारात माथा टेकून प्रार्थना करणार आहेत. त्यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.