बीड जिल्ह्यातील १९८ गावांच्या पाणी प्रश्नासाठी गेवराईत सुरू असलेल्या अर्धनग्न आमरण उपोषणात आंदोलकांची प्रकृती खालावली आहे. १४ वर्षांपासून रखडलेल्या जायकवाडी उपकालवा मंजुरीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.