महिला आरक्षण विधेयक आणि सीमांकन विधेयकासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केली आहे. लोकसभेतील 33 टक्के महिला आरक्षण सध्याच्या 543 जागांवर तात्काळ 2029 पासून लागू करावे, अशी पक्षाची मागणी आहे. 2011 च्या जनगणनेवर आधारित सीमांकनाला देसाई यांनी विरोध दर्शवला, हे लोकशाहीसाठी योग्य नाही, असे ते म्हणाले.
या विधेयकावरून इंडिया आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे म्हटले जात आहे, तर काँग्रेसने शरद पवारांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे जो अंतिम आदेश देतील, तीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत भूमिका असेल, असे अनिल देसाई यांनी ठामपणे सांगितले. इंडिया आघाडीत राहूनही पक्षाला पक्षप्रमुखांचा निर्णय शिरोधार्य असेल, असे त्यांनी नमूद केले.