भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी साईदरबारी हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला त्यांनी उपस्थिती दर्शवली…साईदर्शनानंतर अमोल मुजूमदार यांनी संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सुरू असलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेला भेट देत खेळांडूचे मनोबल वाढवले…साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अमोल मुजुमदार यांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.