गेल्या दीड महिन्यापासून मालेगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पावसाअभावी निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फटका सर्वच पिकांना बसल्याने पिके करपू लागली आहे. पीक करपू लागल्याचे शेतकरी हतबल झालेल्या तालुक्यातील लोणवाडे येथील विजय पवार या शेतकर्याने 5 एकरावरील मक्याच्या उभ्या शेतात जनावरे सोडून संताप व्यक्त केला. दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना दिलासा दिला मात्र आता जास्त वेळ नं लावता तातडीने भरीव मदत करावी, अशी मागणी पवार यांच्यासह तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.