लोहार समाजाच्या अन्नत्याग आंदोलनाने पाचव्या दिवशी आक्रमक वळण घेतले. दादासाहेब कळसाईत यांची प्रकृती खालावल्यानंतरही शासनाने दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांनी पंढरपूर-कराड मार्गावर अर्धनग्न रास्ता रोको केला. अण्णाभाऊ पाटील महामंडळाच्या धर्तीवर लोहार समाजाला निधी व महामंडळावर समाजातील व्यक्तींच्या नियुक्त्या ही प्रमुख मागणी आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन राज्यभर तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.