इम्तियाज जलील यांनी सीमांकन विधेयकावर कमीत कमी पाच दिवस चर्चा करण्याची मागणी केली आहे. एक दिवसाच्या अधिवेशनावर त्यांनी आक्षेप घेतला असून, याचे परिणाम देशावर दीर्घकाळ राहतील असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची भूमिका देशाच्या हिताची नसून, ती फक्त कुटुंबाच्या फायद्यासाठी असल्याचे जलील यांनी नमूद केले.