महाराष्ट्रात सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव येत असून, पुढील काही दिवसांत तापमानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ होत असताना, किमान तापमानात मात्र घट दिसून येत आहे. कोकण विभागात हवामानात बदल होताना दिसत आहे. दिवसा उष्ण आणि कोरडे हवामान जाणवत असून, पहाटेच्या वेळी काहीसा गारवा आहे. येथील किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात निरभ्र आकाशासह कोरडे आणि उष्ण हवामान कायम राहील. किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असून, ३० नोव्हेंबर रोजी त्यात एक अंशाने घट होण्याचा अंदाज आहे.