दुष्काळग्रस्तांच्या वेदना मला माहीत आहेत. माझ्या आईने डोक्यावर हंड्याने पाणी आणून मला अंघोळ घातली आहे. माझ्या आईने हातपंपाने हापसून पाणी आणले आहे. त्यामुळे आईच्या पोटाचे नळ सुद्धा फुगले होते. पोटदुखीचा त्रास झाला होता. हा लहानपणीचा आईच्या आठवणीतला पाणी टंचाईच्या काळातला अनुभवलेला प्रसंग सांगताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भावुक झाल्याचे पहायला मिळाले.