मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली. जी तीन मजली इमारत कोसळून 8 जणांचा जीव गेला त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारतीच्या केवळ तळमजल्यालाचं पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला. त्यामुळे आता इतर मजले का बांधले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.