मुंबईकरांसाठी मोठी बातमी! रेल्वे स्टेशनवर लष्कराने उभारलेला पादचारी पूल तोडण्यात येणार

×

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! रेल्वे स्टेशनवर लष्कराने उभारलेला पादचारी पूल तोडण्यात येणार

मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर अवघ्या ११७ दिवसांत लष्कराने उभारलेला प्रभादेवी-परळ पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. खार ते मुंबई सेंट्रलदरम्यान सहावी रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी पुलाची जागा आवश्यक आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेकडून पुलाच्या परिसराची पाहणी सुरू आहे. तसेच पर्यायी पादचारी पूल उभारण्यासाठी जागेचीही तपासणी करण्यात आली. एल्फिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा पूल तातडीने उभारण्यात आला होता. दुर्घटनेनंतर बॉम्बे सॅपर्सने सुमारे १० कोटी रुपये खर्चून प्रभादेवी-परळ, करी रोड आणि आंबिवली येथे पूल उभारले होते. सहाव्या मार्गिकेच्या प्रस्तावित रचनेत प्रभादेवी-परळ पूल अडथळा ठरत असल्याने हटवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या पाडकामाची तारीख अद्याप निश्चित नाही.

Vishal Gangurde