गेल्या काही काळापासून महाराष्ट्र राज्य सरकार जलवाहतुकीला अधिकाधिक प्राधान्य देत आहे. याच धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मुंबईत पहिली अत्याधुनिक इलेक्ट्रिक कॅन्डेला बोट दाखल झाली आहे. देवयान असे नाव देण्यात आलेली ही बोट स्वीडनहून खास मुंबईसाठी आणण्यात आली आहे, ज्यामुळे जलप्रवासाच्या भविष्यात एक क्रांती घडणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या विशेष पुढाकाराने ही बोट मुंबईत आणण्यात आली असून, तिचे आगमन मुंबईतील जलवाहतुकीसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. देवयान ही 100% इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल बोट आहे.