ऐन दुष्काळात एका उच्चंशिक्षित तरुण शेतकऱ्याने पाण्याचे योग्य नियोजन करीत तैवान पेरूच्या बागेतून चांगल उत्पन्न मिळवलं. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील ताकबीड गावचे बालाजी मंडलापुरे यांनी मनरेगा योजनेतून एक एकरात पेरूची बाग लावली होती. यासाठी त्यांना आतापर्यंत 1 लाख रुपयांचा खर्च आला. आता प्रत्येक झाडाला १५ ते २० किलो पेरू लागलाय.