सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ येथील कर्नाटककडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जाणारया रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे दिवसेंदिवस वाहनांच्या अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहेत. मिरज तालुक्यातील म्हैसाळ हे सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणार गाव आहे तिथून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर कर्नाटकची हद्द सुरू होते.महाराष्ट्रातून कर्नाटककडे आणि कर्नाटकातून महाराष्ट्राकडे येणारा हा प्रमुख मार्ग आहे.या मार्गावरून दररोज हजारो वाहन ये-जा करत असतात.पण महाराष्ट्राच्या हद्दीत असणारा चार ते पाच किलोमीटरच्या रस्त्यावर ठीक ठिकाणी पडलेले भले मोठे खड्डे वाहनधारक व प्रवाशांच्यासाठी जीव घेणे बनले आहेत.या उलट महाराष्ट्राची हद्द संपल्यावर कर्नाटक मध्ये पाऊल ठेवताच,समोर चौपदरी चकचकीत रस्ता पाहायला मिळतो