राष्ट्रपती उद्या शेगावात, संत गजानन महाराज मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त

×

राष्ट्रपती उद्या शेगावात, संत गजानन महाराज मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त

बुलढाणा जिल्ह्यात उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महा आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. त्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी जाण्याची शक्यता असल्याने मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १० जिल्ह्यांतील पोलीस दल सुरक्षेसाठी तैनात असून, संपूर्ण शेगाव शहरात उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

manasi mande