शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे… 10 वर्षांची सेवा पूर्ण करूनही कायम सेवेत सामावून घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आज साई मंदिरापासून मुंबईतील चैत्यभूमीपर्यंत पायी दिंडीला सुरुवात केली… डोक्यावर संविधान घेऊन निघालेल्या या कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करून कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे… अशोक लोंढे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून, टप्प्याटप्प्याने आणखी कर्मचारी सहभागी होणार आहेत…6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमी येथे या आंदोलनाची सांगता होणार आहे… सुमारे 1800 कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न या आंदोलनातून उपस्थित करण्यात आला आहे.