राज्यामध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. राज्यातील बळीराजा दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. अहिल्यानगरमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 297 गावांमध्ये 364 पाण्याचे टँकर सुरू आहेत. आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. टँकर भरण्याच्या स्त्रोतावरच जलशुद्धीकरण पंप बसवले जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.