महाड तालुक्यातील भांदेकोंड परिसरात रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्या रस्त्यावर बिनधास्त बसलेला दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.