नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यात सर्वाधिक फटका भात पिकाला बसला असून, नंदुरबार जिल्ह्यात सरासरी २४ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. मात्र, पावसाअभावी यंदा केवळ १४ हजार हेक्टर क्षेत्रावरच भाताची लागवड झाली असून, सरासरी १० हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झालेली नाही. भात पिकाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते.