शरद पवारांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाचा मसुदा तपासल्यानंतरच पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट होईल, असं म्हटलं आहे. दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनीही विधेयकाचा अभ्यास केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे डिलिमिटेशनवरून राष्ट्रवादीत वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत.