शिवजन्मभूमी ते शिर्डीपर्यंत सायकल वारी, शेतकऱ्यांचाही सहभाग

×

शिवजन्मभूमी ते शिर्डीपर्यंत सायकल वारी, शेतकऱ्यांचाही सहभाग

आरोग्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आज शिवजन्मभूमी जुन्नर ते शिर्डी अशा सायकल वारीचे प्रस्थान झालंय. नारायणगाव येथील युवकांच्या या उपक्रमाचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. निरोगी आयुष्य आणि सह्याद्रीतील वृक्षतोड थांबवून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत ही वारी आयोजित करण्यात आलीये. या १११ किलोमीटरच्या दोन दिवसीय प्रवासात ६ ते ७५ वयोगटातील २७५ हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले आहेत. यामध्ये महिला, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे.

Vishal Gangurde