भंडारा गोबरवाही आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. गॅस एजन्सीकडून होणाऱ्या अनियमित पुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. ऑनलाइन बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याची मोठी तक्रार ग्राहकांनी केली आहे.