भारतीय महिला संघाची उपकर्णधारणदारांनी सांगलीची कन्या स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा पार पडतोय. धुमधडाक्यात हा विवाह सोहळा संपन्न होणार असून या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी मानधना कुटुंबाकडून करण्यात आलेली आहे. नवरदेव पलाश मुच्छल देखील वऱ्हाडी मंडळींसोबत सांगलीत दाखल झाला आहे. मानधना परिवाराकडून त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलं.