पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात विकासकामांची पोलखोल करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील डांबरी रस्त्याच्या मधूनच अचानकपणे पाण्याचा प्रचंड फवारा उसळला. यावेळी रस्ताच फुटला की काय? असा आभास झाल्यानं काही काळासाठी नागरिक भयभीत झाले.