परशाने उडी घेत..आर्चीला प्रेमात पाडले ती करमाळ्याची विहीर कोरडी पडली…

×

परशाने उडी घेत..आर्चीला प्रेमात पाडले ती करमाळ्याची विहीर कोरडी पडली…

परशाने उडी घेत..आर्चीला प्रेमात पाडले ती करमाळा तालुक्यातील देवळाली येथील 1965 साली बांधलेली 50 फुटी दगडी विहीर कोरडी ठाक पडली आहे. यंदा दुष्कळाने राज्यातील अनेक ठिकाणचे जलस्रोत आटले आहे. आजपर्यंत आम्ही आमच्या काळात कधीच ही विहीर कोरडी पाहाली नाही असे शेतकरी म्हणत आहे. जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचण जाणवत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याची सोय करावी. या महिन्यात या विहिरीला हाताला येईल एवढे पाणी असते परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. सैराट सिनेमाचे चित्रीकरण झालेली ही विहीर असल्याने आता ही विहीर प्रकाशझोतात आली आहे.

 

Atul Kamble