वाशिममध्ये तूर उत्पादन घटणार, शेतकऱ्यांची वाढली चिंता

×

वाशिममध्ये तूर उत्पादन घटणार, शेतकऱ्यांची वाढली चिंता

वाशिम जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे तूर उत्पादनात घट होण्याची शक्यता असतानाच, आता तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धुके आणि ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगांमध्ये अळी शिरून दाण्यांचे नुकसान करत असल्याचे दिसून येत आहे. तूर शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना वाढलेल्या अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. आधीच दुष्काळामुळे तुरीच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यात आता अळीचे संकट आल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

 

KALYAN DESHMUKH