शशिकात शिंदे म्हणाले की, पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आहे. शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर कुणी टीका केली, तर आम्ही खपवून घेणार नाही. विजय वडेट्टीवार यांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये. डिलिमिटेशन दर २० वर्षांनंतर होत असते. भारतातही या निर्णयाला पाठिंबा दिला. सभागृहात विधेयक आल्यानंतर त्यावर चर्चा करतो. त्यात काही सुधारणा सुचवतो आणि आवश्यकतेनुसार बदलही होतात. सोमवारी आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. गल्लीतील नेत्यांनी एवढी घाई करण्याची गरज काय? पवार साहेब रुग्णालयात असल्यामुळे ते ऑनलाइन बैठकीत सहभागी होणार होते. सकाळपासून आमच्यावर टीका करायला सुरुवात केली. पवार साहेब गेले होते, त्यावेळी ज्येष्ठतेच्या आधारावर निर्णय घेतला होता. सोमवारी बघून त्यांनी टीका किंवा निर्णय घ्यायला हवा होता. काही मतदारसंघ मोठे असल्यामुळे संपर्क साधणे अवघड होते. काँग्रेस याला कशासाठी विरोध करत आहे, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. विजय वडेट्टीवार यांना बोलण्याची घाई झाली. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना त्यांनी दहा वेळा विचार करायला हवा होता. त्यांनी शरद पवार यांची माफी मागावी.