भावांनो,गायीच्या शेणातून पिकवा पैसा, 8 बिझनस आयडियाने मिळकत वाढवा

created by : अतुल कांबळे 

 25 May 2025

हल्ली पूजाविधींसाठी गायींच्या गोवऱ्यांना प्रचंड मागणी आहे.एका पाकिटाची किंमत ऑनलाईन एक ते दोन हजार आहे.

गायीच्या शेणांपासून ऑर्गेनिक पेंटचे उत्पादन करुन महिन्यास २ ते ५ लाख आरामात कमवू शकता.सरकारी -खाजगी दोन्ही सेक्टरमध्ये पेंटला मागणी

गोबर गॅसचा मोठा प्लांट तयारकरून महिन्याला लाखोंची कमाई होते.यातून सीबीजी,बायो फर्टिलायझर व लिक्विड स्लरी तयार केली तर त्यालाही मागणी आहे.

जयपूरात गोबरपासून हँडमेड पेपर-कॅरी बॅग तयार करण्याचा प्रकल्प आहे.बाजारात इको-फ्रेंडली वस्तूंना मोठी मागणी आहे

शेणापासून लाकूड ( गौकाष्ठ ) बनवता येते. या लाकडांना धार्मिक ते अत्यंविधीपर्यंत मागणी आहे.५० हजार महिना उत्पन्न मिळते

शेणापासून साबन तयार करता येतो. पायरिया व स्कीन एलर्जीवर गायीच्या शेणाचे दंतमंजन प्रभावी आहे.

 गोमूत्र व शेणापासून फिनाईल,पंचगव्य,जीवामृत आणि किटनाशक तयार होते. सेंद्रिय शेतीत मागणी मोठी आहे.महिनाकाठी ५ ते १० लाख कुठेच गेले नाहीत

 शेणापासून वर्म कंपोस्ट खत तयार करुन शेती, गार्डनिंगकरीता विकू शकता.ऑनलाईन खूप मागणी,५० टन खतापासून महिन्यास ३.२५ लाखाची कमाई