ट्रेनच्या ड्रायव्हरची ड्युटी किती तासांची असते ?

created by : अतुल कांबळे 

24 May 2025

 भारतासह ट्रेनने लांबचा प्रवास अगदी सर्वसामान्यांच्या आवाकातला असतो.भारतात १३ हजाराहून अधिक ट्रेन धावतात.

ट्रेन चालवण्यात ड्रायव्हर म्हणजे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलटची भूमिका मोठी असते.

प्रत्येक ट्रेनमध्ये दोन पायलट असतात.तसेच लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये मधल्या प्रवास ड्रायव्हरही बदलत असतात

ट्रेनच्या ड्रायव्हरची ड्यूटी नेमकी किती तासांची असते.जर तुम्हाला माहीती नसेल तर पाहूयात..

 ट्रेन ड्रायव्हर आणि गार्डचे रोस्टर बनवलेले असते. ड्रायव्हरची शिफ्ट एक दिवसात आठ तासांची असते. परंतू आवश्यकतेनुसार त्यात बदल होऊ शकतो

लोको पायलटला एक्स्ट्रा ड्युटी केल्यावर ओव्हरटाईम देखील दिला जातो.

पॅसेंजर ट्रेनमध्ये ड्रायव्हरला आठ तासांपेक्षा अधिकची ड्यूटी नसते येथे दर आठ तासाला ड्रायव्हर बदलला जातो.

लोको पायलटची थेट भरती होत नाही. आधी असिस्टंट लोको पायलट पदाची भरती होते.अनुभवानंतर पदोन्नती होते.

 लोको पायलटसाठी उमेदवार १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण हवा,तसेच संबंधित क्षेत्रात आयटीआय वा इंजिनिअरिंग डिप्लोमा हवा