490 किमी रेंज, 39 मिनिटात चार्ज, सर्वात स्वस्त 7 आसनी इलेक्ट्रीक कार

22 July 2025

Created By: Atul Kamble

Kia Carens Clavis EV साऊथ कोरियन इलेक्ट्रीक  कार भारतीय बाजारात लाँच झालीय

मुळच्या Carens Clavisच्या पेट्रोल-डिझेल व्हर्जनवर आधारित या ई-कारची सुरुवातीची किंमत १७.९९ लाख रु. ( एक्स शोरुम ) आहे.

ही देशाची स्वस्त 7 सिटर ई-कार असून तिची बुकींग सुरु झाली असून त्यासाठी २५ हजाराची टोकन अमाऊंट घेतली जातेय

ही ई-कार लुक आणि डिझाईनबाबत ICE व्हर्जनसारखी आहे.यात आईस-क्युब पॅटर्नचे हेडलाईट आणि स्लीम एलईडी लाईट बार आहे.

या कारमध्ये दोन बॅटरी पॅक ऑप्शन आहेत,ज्यात एकात ४२ kWh युनिटची रेंज ४०४ किमी दुसरा ५१.४kWhची युनिट रेंज ४९० किमी आहे

१०० kw डीसी फास्ट चार्जरने कारची बॅटरी ३९ मिनिटात १० ते ८० टक्के चार्ज होते. फ्रंट एक्सलवरील इलेक्ट्रीक मोटर १७१ एचपी पॉवरचा आहे. ही कार ०-१०० किमी प्रति तास वेग केवळ ८.४ सेंकदात पकडते

कारच्या केबिनमध्ये १२.३ इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टम आणि १२.३ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेवाला डुएल-स्क्रीन सेटअप दिला आहे

 वेंटिलेटेड फ्रंट सिट्स,व्हायरलेस एप्पल कारप्ले,एंड्रॉईड ऑटो,पॅनोरमिक सनरुफ, प्रीमियम बोस साऊंड सिस्टीम,४-वे इलेक्ट्रीकली एडजस्टेबल ड्रायव्हर सिट यात आहे

सहा एअर बॅग, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्युशनसह एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक यात आहे.