उपाशी पोटी केळी का खाऊ नयेत ? डाएटीशियन सांगितली 5 कारणे
21 July 2025
Created By: Atul Kamble
सकाळी नाश्त्यासाठी केळी सर्वात बेस्ट, यात शर्करा,पोटॅशियम आणि फायबरसारखी पोषक तत्वं असल्याने लगेच एनर्जी मिळते
केळ खाल्ल्याने एनर्जी जरी मिळत असली तरी रिकाम्या पोटी खाणे योग्य नाही. काय कारण आहे त्यामागे जाणूयात
रिकाम्या पोटी केळ खाल्ल्याने शरीरात मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे संतुलन बिघडते.ज्यामुळे एसिडिटी किंवा छातीत जळजळ होऊ शकते
केळात नॅचरल शुगर असते.त्यामुळे रिकाम्या पोटी खाल्याने ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढते. डायबिटीज रुग्णासाठी हे धोकादायक आहे.
ट्रिप्टोफॅन आणि हाय मॅग्नेशियम केळीत असते. ते झोप येणाऱ्या हार्मोनला एक्टीव्ह करु शकतात. त्यामुळे रिकाम्या पोटी केळ खाल्ल्याने सुस्ती किंवा थकवा येतो
केळ रिकाम्या पोटी खाल्याने काही लोकांना ब्लोटिंगची समस्या होऊ शकते. केळ्यात स्टार्च अधिक असल्याने ते लवकर पचत नाही.
मॅग्नेशियम आणि पोटॅशियम अधिक असल्याने रिकाम्या पोटी खाल्ली तर रक्तप्रवाहात मिनरल्स वाढतात. ज्यामुळे असंतुलन वाढते. किडनी रुग्णांनी खाऊ नये
तुम्ही सकाळी नाश्तात ओट्स वा दही वा ड्रायफ्रूट्स खाल्यानंतर केळी खाऊ शकता. त्याने त्रास होणार नाही.पण रिकाम्या पोटी खाऊ नये..
जिमला जाण्याआधी केळी कधी खाऊ नयेत.वर्क आऊट झाल्यानंतर केळी खाणे बेस्ट आहे.
दारूच्या एका ग्लासाला पेग का म्हणतात ?