15 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
मारुती सुझुकीच्या पोर्टफोलियोत तुम्हाला अनेक कारचे पर्याय आहेत. मात्र,काही पर्यायांना मार्केटमध्ये कोणती तोड नाही.
मारुती सुझुकीच्या अशाच एका कारची आपण माहिती घेत आहोत ती कार म्हणजे EECO VAN ची
ऑक्टोबर २०२६ मध्ये या कारची चांगली विक्री झाली. मारुतीच्या या EECO VAN कारची दर महिन्याला १० ते १३ हजार युनिट्स विकली जातात.
गेल्या ऑक्टोबरात कंपनीने 13,720 EECO VAN कार विकल्या आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये याच्या 13,537 युनिट्स विक्री झाल्या होत्या.
ही कार मल्टीपल ऑप्शनमध्ये येते. यात 1.2 लिटरचे फोर सिलींडर इंजिन आहे. जे 52.7kW पॉवर सीएनजी वर देते.
सीएनजी व्हेरिएंटचे क्लेम्ड मायलेज २६.७८ किलोमीटर प्रति किलोग्रॅम आहे. तसेच ही व्हॅन पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्यायात मिळते.
पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ५.२८ लाख रुपये एक्स शोरुमपासून सुरु होते. तर सीएनजी व्हेरिएंटची किंमत ६.४५ लाख रुपयांनी सुरु होते.