15 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
बाजारात छोट्या कारना नेहमीच मागणी असते. सुव्ह खरेदी करण्याकडे लोकांचा कल असताना ऑक्टोबरात हॅचबॅक कारची ही विक्री झाली आहे.
मारुती सुझुकीने ऑक्टोबरात २,१२,३८४ युनिट पॅसेंजर व्हेईकल विकल्या. जी गेल्या वर्षी ऑक्टोबरात विक्री झालेल्या १,७६,३१८ युनिटच्या तुलनेत २० टक्के जास्त आहे.
वॅगनआर बेस्ट सेलिंग कार - या दरम्यान मारुतीची टॉल बॉय म्हणजे वॅगनआर देशाची बेस्ट सेलिंग कार ठरली.वॅगनआरच्या २३,७४७ युनिट विक्री झाले
मारुतीची ब्रेझाचे २२,४३६ युनिट विक्री झाले. तसेच बलेनो २०,९१९ युनिट विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
मारूतीची दुसरी सर्वात स्वस्त कार मारुती ऑल्टो के-१० ची मागणी अचानक वाढली. Maruti Alto K10 ची मागणी अचानक वाढली. याच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली.
ऑक्टोबरात मारुती ऑल्टोचे ११,५२३ युनिट विक्री झाले होते. जे गेल्या वर्षी यात काळात विक्री झालेल्या ६,२१० युनिटहून ८६ टक्के जास्त आहेत.
मारुती एस-प्रेसोनंतर ऑल्टो के १० कंपनीच्या पोर्टफोलियोत सर्वात स्वस्त कार आहे. याची सुरुवातीची किंमत ३.७० लाख आहे.
मारुती ऑल्टो के-१० मध्ये १.० लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. जे ६८ बीएचपीची पॉवर आणि ९१.१ Nm चा टॉक जनरेट करते.
मारुती ऑल्टो के १० चा पेट्रोल व्हर्जन २४ किमी प्रति लिटर आणि सीएनजी व्हर्जन ३३ किमी प्रति किलोग्रॅमचे मायलेज देतो.
यात ७ इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम दिली आहे. जी एंड्रॉईड ऑटो आणि एप्पल कार प्लेला सपोर्ट करते.
याशिवाय यात डिजिटल स्पीडोमीटर, स्टियरिंग माऊंटेड कंट्रोल, किलेस एंट्री, फ्रंट पॉवर विंडो, मॅन्युअल एसी, इलेक्ट्रिकली एडजस्टेबल ORVM आणि USB चार्जिंग पोर्ट दिला आहे.
सेफ्टीसाठी यात ६ एअरबॅग, एपीएससह EBD, रिअर पार्किंग सेंसर, सीट बेल्ट रिमाईंडर आणि हायस्पीड अलर्ट देण्यात आला आहे.