8.95 लाखांची 7 आसनी कार भारीच, 70 टक्के लोकांची पसंत ठरले हे CNG मॉडेल

28 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

 भारतीय बाजारात सीएनजी कारचे मार्केट मोठे आहे. रनिंग कॉस्ट आणि चांगले मायलेज असल्याने सीएनजी कार घेण्यास लोक सरसावले आहेत.

ऑक्टोबरमध्ये देशभरात 1,24,330 युनिट सीएनजी कार विकल्या गेल्या.गेल्यावर्षी याच काळात 1,02,471  CNG युनिट विक्री झाल्याने 21 टक्के ग्रोथ आहे.

यात मारुती सुझुकी सीएनजी कारचा जलवा पाहायला मिळाला.कंपनीच्या सीएनजी सेगमेंटने जवळपास 67 टक्के मार्केटवर कब्जा केला आहे.

 Maruti Ertiga स्वस्त सात आसनी कार आहे. ऑक्टोबरात एर्टिंगाचे एकूण 20,641 युनिट विक्री झाले.

यात 14,308 युनिट एकट्या सीएनजी मॉडेलचे आहेत.म्हणजे Ertigaच्या एकूण विक्रीत CNG व्हेरिएंटची भागीदारी 70 टक्के राहिलीय

मारुती एर्टिगाची सुरुवातीची किंमत 8.95 लाख रुपये आहे. तर सीएनजी व्हेरिएंट 10.93 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येतो.

ही सात आसनी MPV 4,395mm लांब आणि 1,735mm रुंद आणि 1,690mm उंच आहे. तर व्हिलबेस 2,740mm आहे.

या कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन दिले असून ते स्मार्ट हायब्रिड तंत्रासह येते.हे इंजिन 103 bhp पॉवर आणि 136.8Nm चा टॉर्क जनरेट करते.

 याच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.तर CNG व्हेरिएंटमध्ये 5-स्पीड मॅन्युअर ट्रान्समिशन देण्यात आला आहे.

या कारचा पेट्रोल व्हेरिएंट सुमारे 20 किमी प्रतिलिटर आणि सीएनजी व्हेरिएंट 26.11 किमी प्रति किलोग्रॅमचा मायलेज देतो.

यात स्लायडिंग आणि रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स, 17.78 सेमी इंफोटेन्मेंट सिस्टीम, कनेक्टेड कार फिचर्स,ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फिचर्स आहेत.

 सेफ्टीसाठी यात 6 एअरबॅग, ABS सह EBD, हिल होल्ड असिस्ट आणि TPMS सारखे फिचर्स मिळतात.त्यामुळे ही बेस्ट फॅमिली कार बनते.