9 october 2025
Created By: Atul Kamble
मारुती सुझुकीने जीएसटी 2.0 दराअंतर्गत आपल्या सर्व कारच्या किंमतीत कपात केली आहे
किंमतीतील कपातीनंतर मारुती अल्टो K10 आता भारतातील स्वस्त कार राहिली नाही.आता मारती S-Presso ने घेतली आहे,ही कार आता अल्टोपेक्षा 20,000 रुपये स्वस्त आहे.
S-Presso अल्टो K10 पेक्षा आकाराने मोठी आहे.त्यामुळे पाठच्या सीटवर बसणाऱ्यांना आराम मिळतो. S-Presso त केवळ दोन फ्रंट एअरबॅग आहेत.कारमध्ये 1- लिटर नेचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे
S-Presso चे डिझाईन SUV सारखे आहे.जे चांगला ग्राऊंड क्लिअरन्स देते.भारतीय रस्त्यांसाठी ते उपयुक्त आहे.
यात 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, Android Auto आणि Apple CarPlay, स्टीअरिंग माऊंटेड ऑडिओ आणि वॉयस कंट्रोल, फ्रंट पावर विंडो, आणि मॅन्युअल एसी सारखे फिचर्स आहेत
S-Presso मध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएम आणि इंजिन आयडल स्टार्ट/स्टॉप सिस्टम सारख्या वैशिष्ट्यांसह देखील येते. मात्र, अल्टो के-10 मध्ये 4-स्पीकर साऊंड सिस्टम आहे, तर S-Pressoमध्ये केवळ 2 स्पीकर आहेत.
सेफ्टीसाठी दोन्ही कारमध्ये ABS सह EBD, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, रिअर पार्किंग सेंसर आणि प्रत्येक सीटसाठी 3-पॉईंट सीटबेल्टसारखे फिचर्स आहेत.
मारुती सुझुकी एस-प्रेसोची एक्स-शोरुम किंमत बेस एसटीडी व्हेरिएंटसाठी सुमारे 3.5 लाखाने सुरु होते. टॉप मॉडेल सुमारे 5.25 लाखापर्यंत आहे.