8 october 2025
Created By: Atul Kamble
आपल्या शरीरात एकच हृदय असते, परंतू तुम्हाला दुसऱ्या हृदयासंदर्भात माहिती आहे का ?
होय आपल्या शरीरात एक नव्हे तर दोन हृदय असतात
हे दुसरे हृदय छातीत नाही तर पायात असते असे म्हटले जाते
हे दुसरे हृदय म्हणजे आपल्या पायाची पोटरी ( Calf Muscles)
काफ मसल्स देखील आपल्या हृदयासारखे काम करत असते
हृदयासारखे पायांच्या पोटऱ्या देखील शरीरात रक्ताभिसरणाचे काम करतात
हृदयाचे काम शरीरात रक्त पंप करण्याचे असते. जेव्हा रक्त पायात पोहचते, तेव्हा त्याला परत हृदयापर्यंत आणणे सोपे नसते.यावेळी पोटरीतील स्नायू काम करतात
जर पोटरीचे स्नायू कमजोर झाले वा आपण बराच काळ एकाच जागी बसलो तर पायात रक्त जमू लागते
यामुळे सूज, वॅरिकोज वेन्स, ब्लड क्लॉटसारख्या समस्या होऊ शकतात