6.31 लाखाच्या फॅमिली सेडान कारवर ग्राहकांच्या उड्या, देते 37KM चे मायलेज

10 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

 कार बाजारात सुव्हची मागणी वाढत असताना सेडान कारची लोकप्रियताही कायम आहे. फॅमिली कार म्हणून सेडान कारला पसंती दिली जात आहे

 किंमत 10 लाख - स्कोडा स्वालिया पाचव्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबरमध्ये 2,638 युनिटची विक्री झाली. गेल्या ऑक्टोबरमध्ये 1,648 युनिट विक्री झाले होते.

 किंमत 7.65लाख - होंडा अमेजचे 3,337 युनिट विक्री झाले आहे. जे गेल्या वर्षी ऑक्टोबरात विक्री झालेल्या 3,630 युनिटच्या 8.1 टक्के कमी आहेत.

किंमत 5.30 लाख - टाटा ऐरिस तिसऱ्या नंबरवर आहे. ही स्वस्त सेडानच्या 4,005 युनिट विकले गेलेत. ही गेल्या महिन्यातच लाँच झाली होती.

 किंमत 6.00 लाख - हुंडई ऑरा सेकंड बेस्ट सेलिंग आहे. याचे एकूण 7,349 युनिट विक्री झाले. जे गेल्या वर्षी विक्री झालेल्या 5,815 युनिटच्या तुलनेत 26.4टक्के जास्त आहे.

 किंमत 6.31 लाख - मारुती डिझायर नंबर वन वर आहे. या कारचे 20,649 युनिट विक्री झाले. गेल्या ऑक्टोबरात 20,791 युनिट विक्री झाले होते.

 मारुती डिझायरमध्ये 1.2 लिटरचे पेट्रोलचे इंजिन आहे.याचे पेट्रोल व्हेरिएंट 25 KM प्रति लिटर आणि CNG व्हेरिएंट 35 किमी प्रतिकिग्रा मायलेज देते.