10 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करावा लागतो.
नाचणीची भाकरी रोज खाल्ली तर शरीराला काय फायदे मिळतील हे पाहूयात.
नाचणीत कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटेशियम, फायबर, प्रोटीन, व्हिटामिन-बी,ग्लुटेन-मुक्त आणि एंटी-ऑक्सीडेंट सारखी पोषक तत्वे भरपूर असतात.
रागी म्हणजे नाचणीचा समावेश डाएटमध्ये केल्यास रक्तातील आयर्नची कमतरता पूर्ण होते. रक्त वाढ होते.
नाचणीची भाकरी कॅल्शियमने परिपूर्ण असते. त्याने हाडांना मजबूती मिळते.
नाचणीत फायबर असल्याने पोटाचे आरोग्य चांगले रहाते.
हल्ली हृदयाचे रोग वाढत आहेत. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नाचणीचा समावेश आहारात करणे गरजेचे असते.
नाचणी भाकरी प्रमाणात खावी जास्त खाल्ल्याने याचे त्रास होऊ शकतो.