वायू प्रदुषणात फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी ही योगासने फायद्याची..

10 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

हिवाळ्यात आपली लाईफस्टाईल देखील बदलावी लागेल.

थंडीत वायू प्रदुषण देखील वाढत असते. त्यामुळे डोळे, घसा आणि नाकात त्रास होतो. काहींच्या फुप्फुसांवर परिणाम होतो.

काही योगासनांचा फायदा फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी होतो. चला तर ही कोणती योगासने हे पाहूयात

भुजंगासन - वायू प्रदुषणात फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी भुजंगासन करु शकता. या आसनाला कोब्रा पोज देखील म्हणतात. फुप्फुसांची काम करण्याची क्षमता याने वाढते.

भुजंगासन करताना पोटावर झोपावे,दोन्ही हात खांद्याजवळ ठेवावे,त्यानंतर श्वास घेत शरीराचा पुढचा भाग बेंबीपर्यंत वर उचलत आकाशाच्या दिशेने पाहावे.

 उष्ट्रासन - जे लोक उष्ट्रासन रोज करतात त्यांची फुप्फुसे कधी कमजोर होत नाहीत. वायू प्रदुषणातही ती मजबूत रहातात.

उष्ट्रासन करताना गुडघ्यावर उभे रहावे, नंतर हाताला कंबरेवर ठेवावे.आता श्वास घेत पाठच्या दिशेने वाकावे आणि हातांनी तुमच्या टाचा धराव्यात. २० ते ३० सेंकद याच पोझिशनला राहावे.